Monday, July 7, 2014

Lokmat dt 6-jul-2014 hello dhule

http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=47&eddate=07%2f06%2f2014

बनावट रॉयल्टी छापणारा अटकेत

काही अधिकार्‍यांचा समावेश

रॅकेटचा पर्दाफाश : वाळू तस्करीप्रकरणी मोहाडी पोलिसांचा सेंधवाला छापा

धुळे : शिरपूर तालुक्यातील हिसपूर येथून मुंबईकडे जाणार्‍या वाळूच्या तस्करी प्रकरणातील बनावट रॉयल्टी पावती संगणकावर तयार करणारा व प्रीन्स दामोदर गुप्ता (वय ३0, रा. टिळक रोड, सेंधवा) यास शनिवारी सेंधवा येथे मोहाडी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी आठवा आरोपी गळाला लागल्याने रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. 
मोहाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरिक्षक हेमंत पाटील, हवालदार नरेंद्र सहाय्यक निरिक्षक अशोक रामराजे, हवालदार नरेंद्र कुळकर्णी, प्रभाकर बैसाणे, शिरीष भदाणे, मोबीन शेख, संदीप खैरनार, बापू कोकणी यांनी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
सेंधवा येथे संगणकावर बनावट रॉयल्टीची पावती तयार करणारा महाभाग गुप्ता हा रंगेहाथ पथकाला सापडल्याने वाळू तस्करीतील हेराफेरीचे प्रकरण गंभीर झाले आहे. गुप्ताचा संगणक, सीपीयू, प्रिंटर मोहाडीच्या पोलिस पथकाने जप्त केला आहे. वाळू तस्करी प्रकरणी पोलिसांनी केलेल्या दाखल गुन्ह्याप्रमाणे अल्लाउद्दीन हुसेन मन्सुरी (सेंधवा), नरेंद्र उर्फ अंकल गोविंदराव मदान (नवी मुंबई), विक्की उर्फ विवेक सुरेश अग्रवाल (खेदन, राजस्थान), हरून खान (बडवानी), भास्कर बोराडे (नाशिक), विकास गोवर्धनदास जैन (भिवंडी), महेश शंकर जोशी (ठाणे), प्रिन्स दामोदर गुप्ता (सेंधवा) यांना अटक केलेली आहे. मार्च महिन्यात मोहाडी उपनगर ठाण्याच्या पोलिसांनी महामार्गावरील चाळीसगाव चौफुली येथे वाहनासह सुमारे २५ लाखांची बेकायदेशीर वाळू पकडली होती. या प्रकरणी आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. महेश जोशी जवळून सुमारे एक हजार बनावट रॉयल्टीची पाने जप्त करण्यात आली आहेत. काही वरिष्ठ अधिकारी, तहसिलदार, मंडळाधिकारी, ठेकेदारांच्या संगनमताने वाळूची तस्करी केली जात आहे. बनावट रॉयल्टीचे प्रकार समोर येऊनही जिल्हाधिकारी कार्यालयाने संशयितांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याची हिंमत दाखविलेली नाही. यात कुठे तरी पाणी मुरत असल्याचे म्हटले जात आहे. या व्यवसायातून कोट्यवधींची हेराफेरी केली गेली असून त्यात अनेक अधिकारी, कर्मचारी गोवलेले आहेत. काही अधिकार्‍यांचा समावेश

     

No comments:

Post a Comment